युगे अठ्ठावीस विटेवरी उभा
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा।
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा।
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा।
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा॥
जय देव जय देव जय पांडुरंगा।
रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा॥
तुळसीमाळा गळा कर ठेवुनी कटी।
कासे पीतांबर कस्तुरी लल्लाटी।
देव सुरवर नित्य येती भेटी।
गरुड हनुमंत पुढे उभे राहती॥
जय देव जय देव जय पांडुरंगा।
धन्य वेणूनाद अनुक्षेत्रपाळा।
सुवर्णाची कमळे वनमाळा गळा।
राई रखुमाबाई राणीया सकळा।
ओवाळिती राजा विठोबा सावळा॥
जय देव जय देव जय पांडुरंगा।
रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा॥