थई थई नाचत यावे रंगणी गणराया
थई थई नाचत यावे रंगणी गणराया
ओवाळू आरती.. चरणी वाहिली काया..
भाद्रपदी मास देवा येशी घराला तुझ्या
येण्याने सुख हे अंगणी आले घराला
दुर्वा फुलांची माळा देवा वाहितो तुजला
थई थई नाचत यावे रंगणी गणराया ।।१।।
आत्मरूपाची बनून ज्योती ओवालितो तुजला
भक्ती भावाने देवा तुजला भक्ताने पुजला
अहंकाराचा धूप जालीला तुझ्याच रे पाया
दावीशी लेकराची माया
थई थई नाचत यावे रंगणी गणराया ।।२।।
ओवाळू आरती.. चरणी वाहिली काया..
थई थई नाचत यावे रंगणी गणराया...