ओवाळू आरती मदनगोपाळा
ओवाळू आरती मदनगोपाळा।
श्यामसुंदर गळा वैजयंतीमाळा॥
चरणकमल ज्याचे अति सुकुमार।
ध्वजवज्रांकुश ब्रीदाचा तोडर॥
ओवाळू आरती मदनगोपाळा।
श्यामसुंदर गळा वैजयंतीमाळा॥
नाभिकमळ ज्याचे ब्रह्मयाचे स्थान।
हृदयी पदक शोभे श्रीवत्सलांछन॥
ओवाळू आरती मदनगोपाळा।
श्यामसुंदर गळा वैजयंतीमाळा॥
मुखकमल पाहतां सुखाचिया कोटी।
वेधले मानस हारपली दृष्टी॥
ओवाळू आरती मदनगोपाळा।
श्यामसुंदर गळा वैजयंतीमाळा॥
जडित मुगुट ज्याचा देदिप्यमान।
तेणे तेजे कोंदले अवघे त्रिभुवन॥
ओवाळू आरती मदनगोपाळा।
श्यामसुंदर गळा वैजयंतीमाळा॥
एका जनार्दनी देखियले रूप।
रूप पाहतां जाहले अवघे तद्रूप॥
ओवाळू आरती मदनगोपाळा।
श्यामसुंदर गळा वैजयंतीमाळा॥