कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची
कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची।
बघुन घे साऊली मुर्ती आता त्या पांडुरंगाची॥
मनोभावे भजन कर तु प्रभुच्या लाग चरणाला।
करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या अंतरंगाची॥ १ ॥
असे हा जन्ममोलाचा नको तु घालवू वाया।
हे सदा गारे भुपाळी तु सकाळी त्या श्रीरंगाची॥ २ ॥
धनाचा लोभ सोडून दे धरी सन्मार्ग नेकीचा।
जपून तु चाल रे वेड्या तुटेल ही दोर पतंगाची॥ ३ ॥
मिळावी मुक्ती म्हणुनी भक्ती कर।
भटकू नको जगभर तू वेड्या।
तुला जाणीव रे होईल।
आलेया घोर प्रसंगाची।
कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची॥ ४ ॥