आरती ज्ञानराजा
आरती ज्ञानराजा ।
महाकैवल्यतेजा ।
सेविती साधुसंत ।
मनु वेधला माझा ॥
लोपलें ज्ञान जगीं ।
हित नेणती कोणी ।
अवतार पांडुरंग ।
नाम ठेविलें ज्ञानी ॥
कनकाचे ताट करीं ।
उभ्या गोपिका नारी ।
नारद तुंबरही ।
साम गायन करी ॥
प्रगट गुह्य बोले ।
विश्व ब्रह्मचि केलें ।
रामा जनार्दनीं ।
पायीं मस्तक ठेविलें ॥